सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्या दोन वरिष्ठांची गोळ्या घालून हत्या केली तसेच एकाला जखमी केले. त्यानंतर डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. आसामातील ध्रुब्री जिल्ह्य़ात सीमेलगत हा प्रकार घडला.
प्रभाकर मिश्रा या जवानाने आपल्या बंदूकीतून या अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यानंतर स्वत:वर गोळी झाडली. रुग्णालयात नेत असताना त्याचे निधन झाले. बाबूलाल आणि सुंदर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओमप्रकाश हे कॉन्स्टेबल जखमी झाले. मिश्राने असे पाऊल का उचलले असावे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता, गोळीबार करण्यापूर्वी त्याचा या अधिकाऱ्यांशी वाद झाला. सहकाऱ्यांवर गोळीबार करण्याची गेल्या काही महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पंजाब आणि राजस्थानात असे प्रकार घडले होते.