पंजाबध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. त्यात दोन पाकिस्तानी व दोन भारतीय नागरिकांचा समावेश होता. त्यांच्याकडून कोटय़वधी रूपयांची हेरॉईनची १० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या हॅरोईनची किंमत बाजारात कोटयावधी रुपये आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीतून पाच जण भारतीय हद्दीत प्रवेश करीत असल्याचे बीएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले. जवानांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, हे पाचही जण पळू जाऊ लागले. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. त्यात चारजण ठार झाले. तर, त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

Story img Loader