भारत-पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानी सैन्यदलांच्या लष्करी ठाण्यांवर चीनचे सैनिक आढळून आले आहेत. पाकिस्तानी सैनिकांना या चिनी सैनिकांकडून शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारचा अहवाल सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केंद्र सरकारला सादर केला असून, भारतासाठी ही धोकादायक बाब आहे.
लोकसभेत मंगळवारी सरकारने ही माहिती दिली. मात्र ही माहिती कोणत्याही गुप्तचर संघटनेने दिलेली नसून, या वृत्ताला पृष्टी देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी सभागृहात सांगितले.
चीन व पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांना संरक्षण सहकार्य करत आहेत. हा प्रकार त्यांच्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचाच एक भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन पाकिस्तानला लष्करी मदतीचा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे, असे रिज्जू म्हणाले.
‘‘चिनी सैन्यातील अधिकारी नेहमीच पाकिस्तानला भेटी देत असून, पाकिस्तानच्या सैन्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. उभय देशांमध्ये नेहमीच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या सहकार्याबाबतचे करार होत असतात,’’ असे रिज्जू म्हणाले.

Story img Loader