त्रिपुरामधील भारत-बांगला देशाच्या सीमेनजीक सीमारक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक इसम ठार झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा शिरच्छेद करण्यात आला.
सीमा सुरक्षा दलाचे जवान दक्षिण रामनगर भागात शुक्रवारी रात्री तस्करांचा पाठलाग करीत असताना तेथील गावकऱ्यांनी या जवानांवर लाठीकाठय़ा व चॉपरने हल्ला चढविला. तेव्हा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार करून गावकऱ्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इस्माईल मियाँ हा इसम ठार तर अन्य १० जण जखमी झाले. यावेळी झालेल्या प्रतिहल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा जवान संदीप कुमार याचा स्थानिक लोकांनी शिरच्छेद केल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी बी.एस.रावत यांनी दिली.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा शिरच्छेद
त्रिपुरामधील भारत-बांगला देशाच्या सीमेनजीक सीमारक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक इसम ठार झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा शिरच्छेद करण्यात आला.

First published on: 08-06-2014 at 02:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsf villagers clash in tripura 2 killed and 10 injured