बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर येत्या ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे. या निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागरिकांचे हित आणि त्यासाठीची चळवळ लक्षात घेता बहुजन समाज पक्षाने धनखर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे ट्वीट मायावती यांनी केले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ न शकल्याने देशाच्या सर्वोच्च पदासाठी अखेर निवडणूक पार पडली, असेही त्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या. हीच परिस्थिती उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात पुन्हा उद्भवल्याने येत्या ६ ऑगस्टला निवडणूक होत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

व्यवसायाने वकील असलेले जगदीप धनखर यांनी १९८९ साली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१९ साली पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या तणावपूर्ण संबंधामुळे ते चर्चेत होते. राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठीच्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार मतदान करतील. या निवडणुकीसाठी बिजू जनता दलाने(बीजेडी) यापूर्वीच धनखर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.