आगामी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (बसप) काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाशी (भाजप) युती न करता स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे, बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले आहे.
मायावती म्हणाल्या, निवडणुकांसाठी आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. काँग्रेस आणि भाजपने नागरिकांची निराशा केली आहे. भाजपमध्ये नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी आणि राजनाथ सिंह हे एकमेकांविरुद्धच कामे करत आहेत. तिघे नेते एकमेकांना पाण्यात बघत आहेत. अशा पक्षाला यश मिळणार नाही.नाहीत. तसेच,  अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारात कमालिची वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली आहे. उत्तर प्रदेश राज्य आणखी मागास होत असल्याचे दिसून येत आहे. काही व्यक्ती बसपाला गांभिर्याने घेत नाहीत. परंतु, भूतकाळाचा विचार केल्यास बसपाने या राज्याला स्थिर आणि सुशासन असलेले सरकार दिले आहे.  उत्तर प्रदेशातील शांतता नाहिशी झाल्याने तेथे विकासाची कामे होवू शकत नाहीत. दरवेळी माझ्यावर निवडणुकांच्या काळात चुकीचे आरोप लावले जातात. दिल्लीमध्ये बंगला बांधणे चुकीचे नाही. सर्वच पक्षाचे याठिकाणी कार्यालये आणि बंगले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा