काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हंगामी अर्थसंकल्पात गायींच्या संवर्धनासाठी मोठी योजना जाहीर केली आहे. मोदी सरकार गायींसाठी कामधेनू योजना सुरू करणार आहे. सरकार कामधेनू योजना सुरू करणार आहे. गोमातेच्या सन्मानासाठी मी आणि सरकार कधीच मागे हटणार नाही. त्यासाठी जे आवश्यक असेल ते केले जाईल, असे गोयल यांनी सांगितले. राष्ट्रीय गोकूळ आयोगाची स्थापनी केली जाईल आणि कामधेनू योजनेवर ७५० कोटी रूपये खर्च केले जातील अशी घोषणा गोयल यांनी केली.

पशुपालन आणि मत्स पालनासाठीच्या कर्जाच्या व्याजात २ टक्के सूट मिळेल, असे गोयल यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. अर्थमंत्री गोयल यांनी शेतकऱ्यांना निराश न करता मोठी घोषणा केली.

Story img Loader