Budget 2019: मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातून रेल्वेला काय मिळणार, याची उत्सुकता होती. रेल्वे प्रवाशांसाठी ‘वंदे भारत’ ही नवीन एक्स्प्रेस सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. तसेच देशभरात आता एकही मानवरहित रेल्वे फाटक उरलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत हंगामी अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६४ हजार ५८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांसाठी ‘वंदे भारत’ ही नवी सेमी हायस्पीड ट्रेन सुरु केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

देशभरात आता एकही मानवरहित रेल्वे फाटक उरलेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष रेल्वेच्या दृष्टीने सुरक्षित ठरले, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader