काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी ससंदेत मोदी सरकारचे अखेरचे आणि हंगामी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे छोटे आणि लघु उद्योगासाठीही विशेष योजना जाहीर केली.
एमएसएमईला ५९ मिनिटांत १ कोटींचे कर्ज मिळेल, असे गोयल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषण छोट्या आणि लघु उद्योगांसाठी जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी स्टार्टअप इंडिया आणि स्टँड अप इंडियाचाही उल्लेख केला.
Rs 1 crore loan can be obtained under 59 minutes, says Finance Minister Piyush Goyal while presenting the interim Budget for 2019-20 in the Lok Sabha
Read @ANI Story | https://t.co/U0gHgm3Bt0 pic.twitter.com/oNofi2PJnC
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2019
आता नोकरी शोधणारे नोकऱ्यांची निर्मिती करत आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत १५.५६ कोटी लाभार्थींना ७.२३ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. मुद्रा योजनेचा ७५ टक्के महिलांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर श्रमिकांसाठी पेन्शन योजनेचीही त्यांनी घोषणा केली. पंतप्रधान श्रमयोगी योजनेला त्यांनी मंजुरी दिली. त्याअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील ६० वर्षांहून अधिक वयाच्या कामगारांना महिना ३००० रूपये पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.