“भाजपाला देशाच्या अर्थव्यवस्थेची काहीच काळजी नसल्याने अर्थव्यस्थेच्या चिंध्या झाला आहेत,” असा टोला काँग्रेसचे लोकसभेचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लगावला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याआधीच चौधरी यांनी केंद्र सरकारव टीका केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी सभागृहात जातानाच काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

चौधरी यांनी सभागृहात जाण्यासाठी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. “अर्थव्यवस्थेच्या चिंध्या झाला आहेत. आता निर्मलाजी यावर फक्त कॉस्मॅटीक सर्जरी करुन डागडुजीच करु शकतात. कारण भाजपा सरकार केवळ पाकिस्तान आणि इम्रान खान मुसलमान याबद्दलच बोलताना दिसत आहे,” असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.

शेअर बाजार पडला

देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता सरकार त्यात उत्साहाचे वातावरण आणण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शेअर बाजारावरही अर्थव्यवस्थेसंदर्भातील चिंतेचा परिणाम दिसून आला. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होताच मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे. आज सकाळी बाजार खुला झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (सेन्सेक्स) १४० अंकांनी कोसळला आणि ४०,५७६ वर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक (निफ्टी) १२६.५० अंकांनी कोसळला आणि ११,९१० वर स्थिरावल्याचा पहायला मिळाला.