अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.
A new centrally sponsored scheme PM Atmanirbhar Swasth Bharat Yojana will be launched with an outlay of about 64,180 crores over 6 years: Finance Minister Nirmala Sitharaman. #UnionBudget2021 pic.twitter.com/FE6lSBauil
— ANI (@ANI) February 1, 2021
सीतारामन म्हणाल्या, आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेंतर्गत प्रतिबंधात्मक, गुणकारी, कल्याणकारी आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे. या योजनेसाठी दिलेला निधी प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरावरील आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
आणखी वाचा- Budget 2021: सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाचं केलं स्मरण, म्हणाल्या…
त्याचबरोबर नव्या आजारांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. याद्वारे ७५ हजार ग्रामीण आरोग्य केंद्र, सर्व जिल्ह्यामध्ये चाचणी केंद्र, ६०२ जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच इंटिग्रेटेड आरोग्य माहिती पोर्टल अधिक सक्षम केलं जाणार आहे.
आणखी वाचा- Budget 2021: चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करणार
तसेच नवी १७ सार्वजनिक आरोग्य केंद्र उघडली जाणार आहेत. ३२ विमानतळांवरही याची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थची निर्मिती, ९ बायोलॅबची निर्मिती तर चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजींची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.