देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणणना होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केली.

आणखी वाचा- अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर

संसदेत बजेटदरम्यान बोलताना सीतारामन म्हणाल्या, “मैलाचा दगड ठरणाऱ्या या कामगिरीसाठी मी यंदाच्या अर्थसंकल्पात ३,७६८ कोटींची तरतूद केली आहे.” दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतंच जाहीर केलं होतं की, २०२१ ची जनगणना ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून केली जाणार आहे. डिजिटल इंडियाला प्रमोट करण्साठी पारंपारिक पेन आणि पेपरची पद्धतीपासून दूर होण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आणखी वाचा- Budget 2021: ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्नपासून मुक्ती

“जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे. भारत आता पेन आणि पेपर पासून डिजिटल डेटाकडे जात आहे. ही देशातील जनगणनेच्या कामातील मोठी क्रांती ठरणार आहे,” असं अमित शाह यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- करोना लसीकरणासंदर्भात निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

संबंधित नव्या अॅपमध्ये नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती अपलोड करता येणार आहे. देशभरात १६ भाषांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असून त्यासाठी १२,००० कोटी रुपयांची गरज पडणार आहे, असंही शाह म्हणाले होते.

Story img Loader