केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही क्षेत्रांना मदतीचा हात देण्यात आला आहे तर काही गोष्टी महाग होणार आहेत. या अर्थसंकल्पाने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. मद्य आणि तत्सम पेय (बिअर इत्यादीं)च्या किंमतीमध्ये अर्थसंकल्पात मोठी वाढ जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना काही मोठ्या घोषणादेखील केल्या. करोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करोना प्रतिबंधक लसीचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय देशात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु असताना शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास, नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा करण्यात आलेली असून नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय केवळ पेन्शन किंवा व्याज इतकीच मिळकत असलेले ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आली आहे. पण सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून ती संरचना ‘जैसे थे’ आहे.

Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
Maharashtra Govt
Tax On Liquor : महाराष्ट्रातील मद्यप्रेमींवर महसूल वाढवण्याची जबाबदारी! रिकामी तिजोरी भरण्यासाठी सरकार कर वाढवण्याच्या तयारीत
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
GDP growth likely to be limited to 6 3 percent ​​State Bank print eco news
जीडीपी वाढ ६.३ टक्क्यांवरच मर्यादित राहण्याची शक्यता – स्टेट बँक
Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता

 

Story img Loader