“सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे.  हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो.  हे आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचं बजेट आहे.” अशा शब्दांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“असा अर्थसंकल्प पाहायला कमीच मिळतो, ज्यामध्ये सुरुवातीच्या एक दोन तासांमध्येच एवढ्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना असं वाटत होतं की, सरकार सामान्य जनतेवरचा भार वाढवेल. मात्र आमच्या सरकारने सातत्याने प्रयत्न केला आहे की, अर्थसंकल्प पारदर्शक असायला हवा. मला आनंद आहे की, आज अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचे कौतुक केले.”  असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं.

आणखी वाचा- अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर

आणखी वाचा- Budget 2021 : आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित; शेती आणि शेतकऱ्यांबद्दल अर्थमंत्री काय म्हणाल्या?

“आजच्या बजेटमध्ये देशाला आत्मनिर्भर करणयासाठी प्रयत्न केले गेले आहेत. आरोग्यव्यवस्थेवर आधारित हे बजेट असून, यामध्ये संशोधनावर आधारित प्रगती करण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली गेलेली आहे. संधीची समानता हे सूत्र लक्षात घेत या बजेटमध्ये महिलांसाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. रोजगार संधी वाढवण्यासाठी एमएसई क्षेत्राला चांगला निधी देण्यात आलेला आहे.” असं देखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- करोना लसीकरणासंदर्भात निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Story img Loader