भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा तडाखा बसलेला असतानाच्या काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. करोना व लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढलेली असून, अर्थव्यवस्थेवरही निराशेचे मळभ दिसून येत आहे. अशा परिस्थिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी रविंद्र टागोर यांच्या वचनाचं स्मरण करून पुन्हा उभारी घेण्याचा विश्वास व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजूरी दिल्यानंतर सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाने सामना केलेल्या करोना संकट काळावर नजर टाकली. करोनाच्या संकटाला भारतानं यशस्वीपणे तोंड दिल्याचं त्या म्हणाल्या.
आणखी वाचा- सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच, इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे
भारताने करोना महामारीविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला. जगाच्या तुलनेत भारतात मृत्यूचं प्रमाण कमी होतं, असं सीतारामन म्हणाल्या. अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोर यांचं वचनांचा उल्लेख करत भारताच्या ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाचा दाखला दिला.
सीतारामन म्हणाल्या,”मी रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून शब्द उधार घेते. विश्वास असा पक्षी आहे, जो पहाटे दाट अंधार असतानाही प्रकाशाची अनुभूती घेतो आणि गातो. अशीच भावना भारताने ऑस्ट्रेलियात विजय मिळवल्यानंतर एक क्रिकेटप्रेमी म्हणून देशानं अनुभवली होती,” असं सीतारामन म्हणाल्या.
आणखी वाचा- Budget 2021: चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करणार
करोनाच्या संकटकाळात या अर्थसंकल्पाची तयारी करण्यात आली. देशात संकटाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी कधीही अशी तयारी झाली नव्हती. आज भारतात दोन लस उपलब्ध आहेत आणि त्यांनी केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर १०० किंवा त्याहून अधिक देशांच्या नागरिकांनाच संरक्षण दिले आहे. आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ८० कोटी गरिबांना मोफत अन्न दिलं. करोना महामारीच्या संकटात यंदाचं बजेट खास आहे. लॉकडाऊन झालं नसतं, तर संकटं आणखी वाढलं असतं, असं सीतारामन यांनी यावेळी नमूद केलं.