केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्राच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी महिला तसेच तरुणांसाठी काय असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे.
हेही वाचा >>> Budget 2023 : मोफत धान्य योजनेचा कालावधी एका वर्षासाठी वाढवला, २ लाख कोटींची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी दोन वर्षे मुदतीची निश्चित परतावा देणारी एक मुदत ठेव योजना आणली आहे. या योजनेचे नाव महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट असे आहे. या योजनेंतर्गत महिला किंवा मुलीच्या नावावर जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतील. जमा केलेल्या या पैशांवर ७.५ टक्के व्याज मिळेल. मुदतीच्या अगोदर पैसे काढण्याचीही यामध्ये मुभा असेल.
निर्मला सीतारामन यांनी सिनियर सिटिझन सेव्हिंग योजनेत गुंतवणूक करण्याच्या मर्यादेतही वाढ केली आहे. आता या योजनेंतर्गत ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक कता येईल.
हेही वाचा >>> डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना प्रोत्साहन अन् बरंच काही; अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय तरतूद? जाणून घ्या
दरम्यान, यावेळी सीतारमण यांनी कर्ज, कर सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई याबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच, काय स्वस्त होणार याबद्दलही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. स्मार्टफोन्स, कॅमेराचे लेन्स स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रिक वाहने, एलईडी टिव्ही, बायोगॅस संबंधीच्या गोष्टी, खेळणी आदी बाबी स्वस्त होणार आहेत.