बलुची नेते अकबर बुगती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी येत्या १९ मे रोजी उपस्थित राहावे, असे आदेश बलुचिस्तान उच्च न्यायालयाने जारी केले आहेत.
या खटल्याच्या कामकाजासाठी जातीने हजर राहण्यापासून सवलत देण्यासंबंधी मुशर्रफ यांनी केलेली विनंती मुख्य न्यायाधीश काझी फैझ इसा यांनी फेटाळून लावली. येत्या १९ मे रोजी होणाऱ्या खटल्याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ जातीने उपस्थित राहतील यासाठी योग्य ती तजवीज करावी, असे आदेश न्या. इसा यांनी प्रांतिक सरकारला दिले आहेत. मुशर्रफ हे सध्या कराचीत आहेत. बुगती हत्याप्रकरणी मुशर्रफ यांनी जातीने माहिती घेतल्यानंतर खटल्याच्या कामकाजासाठी अनुपस्थित राहण्यासाठी त्यांना अर्ज करता येईल, असे न्या. इसा यांनी स्पष्ट केले.
बुगती हत्याप्रकरणी मुशर्रफ यांना आदेश
बलुची नेते अकबर बुगती यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी येत्या १९ मे रोजी उपस्थित राहावे, असे आदेश बलुचिस्तान उच्च न्यायालयाने जारी केले आहेत.
First published on: 01-05-2014 at 12:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bugti murder case musharraf ordered to appear in court