दिल्लीतील जाफ्राबाद भागात शुक्रवारी मध्यरात्री चार मजली इमारत कोसळून एक जण ठार तर, १४ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
“इमारतीला तडे गेले असल्यामुळे तिला पाडण्याचे काम सुरू होते. रात्री दोनच्या सुमारास इमारत कोसळली” असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने सांगितले. तसेच “यात फारूख या एका व्यक्तीचा मृत्यू व १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे” असेही ते पुढे म्हणाले.
दिल्ली प्रशासनाकडून याबाबत खुलासा करताना ही इमारत अवैधरित्या उभारली जात असल्याचे म्हटले आहे.