दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलंद शहरातील माय- लेकींवरील सामुहिक बलात्काराची घटना म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये ‘जंगलराज’ असल्याचे संकेत असल्याचे मत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी म्हटले आहे. चोरी आणि सामुहिक बलात्काराच्या या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २४ तासामध्ये आरोपींना अटक करण्याचे आदेश उत्तरप्रदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांनी याप्रकरणात १५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसुन चौकशी केली जात आहे. मुख्य ओरोपी ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे. उत्तप्रदेशमध्ये ‘जंगलराज’ असल्याचे भाष्य करुन मायावती यांनी अखिलेश सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोएडा सेक्टर ६८ मध्ये रहाणार  कुटुंब  नातेवाईकाच्या तेराव्याच्या विधीसाठी शहाजहानपूर येथे चालले होते. कुटुंबात पती-पत्नी, दोन मुली आणि दोन इतर पुरुष मंडळींचा समावेश होता. त्यांची गाडी मध्यरात्री २.३० दरम्यान दोस्तपूर गावाजवळील एनएच ९१ या महामार्गावर थांबली असता झाडीमध्ये दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने गाडीवर लोखंडी सळई फेकून मारली. गाडीच्या चालकाने लगेच ब्रेक मारले व नक्की काय झाले ते पाहण्यासाठी तो खाली उतरला. हीच संधी साधून दरोडेखोर बाहेर आले व त्यांनी संपूर्ण कुटुंबाला बंदुकीच्या धाकावर बंधक बनवले. या टोळीने सुरवातीला मोटारीतील पुरुष व महिलांना महामार्गापासून काही अंतरावर नेत बांधून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी कुटुंबाजवळ असलेले दागिने आणि पैशांची लूट तर केली. पण त्याचसोबत कुटुंबातील ३५ वर्षीय महिला आणि तिच्या १४ वर्षाच्या मुलीवर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. शनिवारी सकाळी बांधून ठेवलेल्या नागरिकांनी स्वतःची सुटका करून घेत पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती. 