Bulandshahr violence: ‘मी या देशाचा एक चांगला नागरिक व्हावं असे माझ्या वडिलांना वाटायचे. धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात ते नेहमी मला हेच सांगायचे. दुर्दैवाने हिंदू- मुस्लीम वादात आज मी वडिलांना गमावले. आता उद्या आणखी किती पित्यांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल सुबोध कुमार सिंह यांच्या मुलाने विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयातून झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. सुबोध कुमार सिंह असे या हिंसाचारात मृत्यू झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सुबोध कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या मुलाने वडिलांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. वडिलांच्या निधनाने त्याला अश्रू रोखता आले नाही. त्याने जातीय तणावावरुन संतापही व्यक्त केला. ‘मी आयपीएस अधिकारी तर माझ्या भावाने चांगला वकील व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. जातीय हिंसाचाराला त्यांचा विरोध होता. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी तू एक चांगला नागरिक व्हायला हवा, असे ते मला नेहमी सांगायचे. आज हिंदू- मुस्लीम वादात मी माझ्या वडिलांना गमावले. उद्या आणखी किती पित्यांचे बळी घेणार ?’, असा सवाल त्याने विचारला आहे.

सुबोध यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
सुबोध हे उत्तर प्रदेशच्या इटाह जिल्ह्याचे होते. त्यांचे वडील राम प्रताप सिंह हे देखील उत्तर प्रदेशमधील पोलीस दलात होते. वडिलांचे दिर्घ आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी सुबोध कुमार यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. सुबोध हे सध्या त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह नोएडात राहत होते. त्यांचा एक मुलगा शाळेत असून दुसरा मुलगा अभियंता शाखेचा विद्यार्थी आहे. सुबोध यांचे मोठे बंधू हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत, असे सुबोध यांचे नातेवाईक सांगतात. १९९५ मध्ये सुबोध हे पोलीस दलात रुजू झाले होते.