१.३० कोटी रुपयांना एका सराफा व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ज्या नोटा देण्यात आल्या त्यावर महात्मा गांधींऐवजी अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो आहे. गुजरातमधली ही घटना आहे. अहमदाबाद शहर पोलिसांनी ही माहिती दिली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नोटांची बंडल्स दिसत आहेत. ज्या नोटांमध्ये महात्मा गांधी यांच्या जागी अनुपम खेर यांचा फोटो आहे. १.६० कोटी रुपयांचे या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नोटांचा आकार, रंग सगळं अगदी खऱ्या नोटांप्रमाणे आहे. मात्र नोटा पाहूनच कळतं आहे की या बनावट नोटा आहेत.

TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
What Eknath Shinde Said About Uddhav Thackeray?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली म्हणणाऱ्या घरबशांना..”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
bangladesh porn star arrested in ulhasnagar
Porn Star Riya Barde Arrested: बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!

मेहुल ठक्कर यांनी दिली तक्रार

सराफा व्यापारी मेहुल ठक्कर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर य प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ठक्कर यांचं अहमदाबाद या ठिकाणी ज्वेलरीचं दुकान आहे. ठक्कर यांनी सांगितलं काही लोकांना २१०० ग्रॅम सोनं हवं होतं. नवरंगपुरा या ठिकाणी २४ सप्टेंबरला एका कुरिअर फर्मला पोहचवायचं होतं. त्याप्रमाणे ते सोनं ठक्कर यांच्या कर्मचाऱ्यांकडून पाठवण्यात आलं. त्यानंतर आरोपीने त्यांना एका प्लास्टिक कव्हरमध्ये असलेले पैसे दिले. ही १.३० कोटींची रोख रक्कम असल्याचं त्याने सांगितलं. हे पैसे तु्म्ही मशीनमध्ये मोजून घ्या असंही सांगण्यात आलं. त्याच दरम्यान हे दोघं जण दुकानातून निघून गेले. १.६० लाखांचं सोनं आहे बाकीचे ३० लाख रुपये आम्ही घेऊन येतो असं कारण त्यांनी दिलं. त्यामुळे ठक्कर यांच्या कर्मचाऱ्यांनीही विश्वास ठेवला. पण जेव्हा ठक्कर यांच्या कर्मचाऱ्यांनी नोटांचं पाकीट उघडलं तेव्हा त्यात बनावट नोटा होत्या. या प्रकरणात नवरंगपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

पोलीस निरीक्षक ए. ए. देसाई यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की आरोपीने सराफा व्यापारी ठक्कर यांची कोट्यवधींची फसवणूक केली. त्यासाठी त्याने तसा कट रचला होता. ज्या नोटा देण्यात आल्या त्यावर अनुपम खेर यांचा फोटो होता.

अनुमप खेर यांनी या नोटांचाव्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच त्यांनी याबाबत आश्चर्यही व्यक्त केलं आहे. कुछ भी हो सकता है अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

लो जी कर लो बात. महात्मा गांधीकी जगह मेरी फोटो है नोटोंपर कुछ भी हो सकता है. असं म्हणत त्यांनी या नोटांचा व्हिडीओ आणि ही बातमी पोस्ट केली आणि आश्चर्य व्यक्त केलं आहे.