उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील २८ भाविक प्रवास करत होते. ही बस रविवारी (५ जून) उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली. या दुर्घटनेत २२ भाविकांचा मृत्यू झाला. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर पोलीस आणि एसडीआरएफ घटनास्थळी पोहचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.

यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ अपघात

हा अपघात बस उत्तरकाशीहून यमुनोत्रीला जात असताना यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ झाला. अपघातानंतर बचाव मोहिमेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहचली. तसेच मदतकार्य सुरू करण्यात आलं.