तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात एका बसला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  हे भाविक रामेश्वराचे दर्शन करून कन्याकुमारीला परतत असताना ही दुर्घटना घडली.
तिरुपती आणि रामेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर ८० भाविकांना घेऊन बस कन्याकुमारीच्या दिशेने निघाली होती. दुर्घटनेच्या वेळी सर्व भाविक झोपले होते. बसमध्ये गॅस सिलिंडर आणि जेवण बनविण्यासाठी लागणारी अनेक साधने होती, यामुळेच बसला आग लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेतील जखमी भाविकांना रामनाथपुरम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

Story img Loader