तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात एका बसला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे भाविक रामेश्वराचे दर्शन करून कन्याकुमारीला परतत असताना ही दुर्घटना घडली.
तिरुपती आणि रामेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर ८० भाविकांना घेऊन बस कन्याकुमारीच्या दिशेने निघाली होती. दुर्घटनेच्या वेळी सर्व भाविक झोपले होते. बसमध्ये गॅस सिलिंडर आणि जेवण बनविण्यासाठी लागणारी अनेक साधने होती, यामुळेच बसला आग लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेतील जखमी भाविकांना रामनाथपुरम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा