हिमाचल प्रदेशमधील कुल्लूत बस दरीत कोसळल्याने १६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. कुल्लूतील संज व्हॅली येथील जंग्ला या गावाजवळ सोमवारी ( ४ जुलै ) पहाटेच्या सुमारास ही घडली. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केली असून त्यांची त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली. यावेळी बसमध्ये ४५ प्रवाशी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटद्वारे या घटनेवर दुख व्यक्त केले. तसेच मृतांनाच्या परिजनांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणाही केली. ”हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खद प्रसंगी आम्ही मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान यांनी ट्विटद्वारे दिली आहे.