उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये बसने मिनी ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून तर १० पेक्षा अधिक जण गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग्रा-अलीगड राष्ट्रीय महामार्ग ९३ वर शुक्रवारी सायंकाळी हा अपघात घडला. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मिनी ट्रकमध्ये एकूण ३० प्रवाशी होते. हे सर्व खंदौलीतील सेवला गावचे रहिवासी असून मुकुंद खेडा येथे तेराव्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा – Woman Molested In Ambulance : रुग्णवाहिकेत महिलेचा विनयभंग, कर्मचाऱ्याने पीडितेच्या पतीचा ऑक्सिजन काढून घेतला अन्…

दरम्यान, या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. हाथरस येथील अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे जखमी आहेत, ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. हाथरसमधील अपघाताची बातमी ऐकून मन सून्न झालं आहे. मी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून २ लाख रुपये, जखमींना ५० हजार रुपायांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus mini truck accident in hathras 15 dead cm yogi adityanath reaction spb