Bypoll Election Result Update : लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या इंडिया आघाडीने आता ७ राज्यांतील १३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत १० जागांवर विजय मिळवला आहे. तर, भाजपाने दोन जागा मिळवल्या असून एका जागेवर अपक्ष आमदार निवडून आला आहे.

बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया (Bypoll Election Result) पार पडली. विविध पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या मृत्यूमुळे किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांमुळे पोटनिवडणूक घेण्यात आली. बिहारमधील रुपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला; तामिळनाडू मधील विक्रवंडी; मध्य प्रदेशातील अमरवारा; उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगळौर;  पंजाबमधील जालंधर पश्चिम आणि हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या ठिकाणी मतदान झाले. आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली.

pakistan security 1
नंदनवनातील निवडणूक: पाकिस्तानप्रेमी ‘जमात’ आता निवडणुकीच्या रिंगणात
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Mayawati, Akhilesh Yadav TIEPL
SP BSP Alliance : सपा-बसपा एकत्र येणार? भाजपाच्या मायावतींवरील टीकेला अखिलेश यादवांचं उत्तर; नव्या आघाडीची चर्चा, बसपाचेही दरवाजे खुले?
Anil Deshmukh statement on election against Devendra Fadnavis
फडणवीसांविरुद्ध लढणार….? अनिल देशमुखांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
bjp strategy in uttar pradesh election
BJP Alliance in UP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं काय चुकलं? मित्रपक्षानंच दाखवला आरसा! संजय निषाद म्हणाले…
Constitution of India
संविधानभान: खासदारांची अपात्रता
Jammu & Kashmir and Haryana Assembly Elections 2024 Date Schedule in Marathi
विधानसभा निवडणुकांचे बिगूल; जम्मू व काश्मीरमध्ये तीन टप्पे; हरियाणात १ ऑक्टोबरला मतदान
UP bypolls Congress in Uttar Pradesh Samajwadi party BJP
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कशी करतोय तयारी?

हेही वाचा >> Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपा पिछाडीवर

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC), आप आणि द्रविड मुनेत्र कळघम (DMK) हे इंडिया आघाडीचे घटकपक्ष आहेत. यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू येथे बुधवारी झालेल्या पोटनिवडणुकीत (Bypoll Election Result) उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये आपचे मोहिंदर भगत यांनी जालंधर पश्चिम मतदारसंघात २३ हजार मतांनी विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी चार जागांवर आघाडी घेतली असून प्रत्येक मतदारसंघात भाजपा पिछाडीवर आहे. तृणमूल काँग्रेसने रायगंज, राणाघाट दक्षिण आणि बागडा विधानसभा जागा आरामात जिंकल्या आहेत. तर, मणिकतलामध्ये पक्ष आघाडीवर असून उमेदवार सुप्ती पांडे ४१ हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने पुढे आहेत.

हिमाचल आणि उत्तराखंड येथे काँग्रेस आघाडीवर

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा पोटनिवडणुकीत (Bypoll Election Result) विजय मिळवला. तर, नालागढमध्येही काँग्रेसच्या हरदीप सिंग बावा यांचा विजय झाला आहे. हमीरपूरमध्ये भाजपाचे आशिष शर्मा जिंकले आहेत. उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आणि मंगळौर या दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मंगळौर विधानसभा जागेसाठी मतमोजणीच्या दहा फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार काझी मोहम्मद निजामुद्दीन यांनी भाजपाच्या कर्तारसिंग धना यांच्यावर ४०० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. 

मध्य प्रदेशात अमरवार जागेवर काँग्रेसचे धीरेन शाह इनवती यांनी (Bypoll Election Result) ४ हजार मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, बिहारमध्ये JD(U) च्या कलाधर प्रसाद मंडळाने रुपौलीमध्ये आघाडी घेतली आहे आणि तामिळनाडूमध्ये, डीएमकेचे अन्निर सिवा हे विक्रावंडी विधानसभा जागेवर १० हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

लोकसभेच्या पराभवानंतर इंडिया आघाडीची पोटनिवडणुकीत झेप

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या या पहिल्या पोटनिवडणुका (Bypoll Election Result) आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष होतं. लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागा जिंकल्या तर, एनडीएच्या साथीने २९३ जागा मिळवून भाजपाने सत्ता स्थापन केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या.