सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार असून, या मतदारसंघांना नवा आमदार मिळणार आहे. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Andheri Bypoll Election Result 2022 Live : पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके आघाडीवर; मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या होणार

पोटनिवडणूक पार पडलेल्या सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघ, बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज मतदारसंघ, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशमधील गोला गोकर्णनाथ आणि ओडिशामधील धामनगर या मतदार संघांचा समावेश होता. ३ नोव्हेंबर रोजी या सर्व ठिकाणी मतदान पार पडले होते.

हेही वाचा – राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

या निवडणुकीत महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व मतदारसंघ सोडला तर भारतीय जनता पार्टी आणि तेलंगणा राष्ट्र समिती(टीआरएस), राष्ट्रीय जनता दल(राजद), समाजवादी पार्टी (सपा) आणि बिजू जनता दल(बीजेडी) या प्रादेशिक पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

ज्या सात जागांवर मतदान झाले, त्यापैकी भाजपाकडे तीन, काँग्रेसकडे दोन आणि शिवसेना व राजदकडे प्रत्येकी एक-एक जागा होती.

हेही वाचा – Andheri East Bypoll Election Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

शिवसेनेतील बंडानंतर आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अगोदर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात सुरुवातीला भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु नंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपाने आपला उमेदवार या निवडणुकीतून मागे घेतला. त्यामुळे या मतदार संघासाठी ऋतुजा लटके यांच्याविरोधात कोणताही प्रबळ उमदेवार न उरल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र तरीही या या जागेसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, ज्यामध्ये ऋतुजा लटके यांच्याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bypolls results counting of votes for 7 assembly seats in 6 states today msr