तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी राज्यात आरोग्य क्षेत्रामधील ९४ कोटींच्या योजनांचे उद्घाटन आज केले असून त्यात रुग्णालय इमारती, इतर सेवा यांचा समावेश आहे.
८०.९२ कोटी रुपयांच्या रुग्णालयत इमारती व रुग्णवाहिका सेवा तसेच वैद्यकीय उपकरणांचा त्यात समावेश आहे. १०८ नंबर फिरवल्यानंतर रुग्णवाहिकेची सेवा मिळते त्यासाठी २५ वाहने विनामूल्य देण्यात आली आहेत. सध्या राज्यात ७२६ रुग्णवाहिका असून त्यात आता नवीन २५ रुग्णवाहिकांची भर पडली आहे. जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने एमआरआय स्कॅन मशिनचे उद्घाटन उधगमंडलम येथे केले. त्यांनी एकूण ९४.७२ कोटींच्या योजना सुरू केल्या आहेत.

Story img Loader