अन्नसुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी लांबणीवर टाकण्यात आला. अन्नसुरक्षा विधेयकाच्या मंजुरीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली. 
अन्नसुरक्षा विधेयक संसदेत मंजूर व्हावे, यासाठी संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ आणि अन्नधान्य पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत, असेही चिदंबरम यांनी सांगितले.
संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्ष आणि काही विरोधी पक्षांचा आक्षेप असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळ गुरुवारी अन्नसुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढण्याच्या तयारीत होते. गेल्या मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली नव्हती. के. व्ही. थॉमस यांनी यासंदर्भातील मसुदा योग्य वेळेत न दिल्यामुळे त्यावेळी यावर चर्चा झाली नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दोन तास अगोदर मसुदा सचिवालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे तो सर्वांपर्यंत पाठवणे शक्य झाले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा