कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. बंगळुरूमध्ये स्कायबस किंवा ट्रॉली बस सुरू केल्यास हा उपाय व्यवहार्य ठरेल का? याबाबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. बंगळुरूत आयोजित ‘मंथन’ या राष्ट्रीय परिषदेत बोलताना वाहतूक कोंडीच्या समस्येवर लवकरच तोडगा काढणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

VIDEO : नागपूरमध्ये भीषण अपघात; फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

बंगळुरूत स्कायबस सुरू करण्यासंदर्भातील अहवाल पुढील तीन महिन्यांमध्ये मिळेल, असे या कार्यक्रमात गडकरी यांनी सांगितले आहे. “आयटी क्षेत्रासाठी बंगळुरू हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरातील वाहतूक कोडींच्या समस्येकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत आहोत. ही समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्कायबसने १ लाख लोकांनी प्रवास केल्यास वाहतूककोडींची समस्या सुटू शकते”, असे गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.

पुरामुळे यंदा बंगळुरू शहराला मोठा फटका बसला आहे. मैसुर-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाल्यांमुळे बंगळुरूकरांना पुराचा सामना करावा लागला. या नाल्यांची लवकरच दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती या कार्यक्रमात गडकरी यांनी दिली. पाच वर्षांमधील सरासरी पर्जन्यमान लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

“१२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास!”

गोरागुंटेपाल्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेबाबत नितीन गडकरींनी निर्णय घेतल्याची माहिती या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. या महामार्गावरील केबलच्या दुरुस्तीसाठी एजन्सीची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासनही गडकरींनी दिल्याचे बोम्माई यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, बंगळुरूमध्ये आलेल्या पुरानंतर मैसुर-बंगळुरु महामार्गावरील गटारांची प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच उपायोजना केली जाईल, अशी माहिती बोम्माई यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister nitin gadkari on bengaluru traffic skybus and trolly bus rvs