डाव्होसमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ध्यातूनच माघारी फिरले. पण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डाव्होसमध्ये थांबून पुढचा किल्ला लढविला. आता उदय सामंत हे देखील राज्यात परतले असून त्यांनी डाव्होसमध्ये महाराष्ट्राने कशी कामगिरी केली याची पडद्यामागची कथा सांगितली आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन डाव्होसमध्ये घडलेल्या घडामोडी सांगितल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे अखंड विश्वात गतीमान कारभार करणारे

उदय सामंत यांनी सांगितले की, “डाव्होसमध्ये दोन किलोमीटर परिसरात जागतिक आर्थिक परिषदेचे शिबीर भरले होते. याठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमेव होर्डिंग्ज लागले होते. इतर देशांच्या प्रमुखाचे होर्डिंग्ज त्याठिकाणी नव्हते. महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये अनेक देशांचे प्रमुख, भारतातील इतर मुख्यमंत्री आणि उद्योजक भेट देत होते. मुख्यमंत्र्यांचे डाव्होसमधील वास्तव्य हे फक्त २८ तासांचे होते. पण या २८ तासांत महाराष्ट्रात ते ज्या गतीने काम करतात, त्याच्या दुप्पट गतीने डाव्होसमध्ये काम करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्यमातून अखंड विश्वाला दाखवून दिले की, एका राज्याचा मुख्यमंत्री कसा काम करु शकतो?”

हे ही वाचा >> Escort Service in Davos: डाव्होसमध्ये वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी; अतिश्रीमंतांनी केलं ‘जीवाचं डाव्होस’!

जिंदाल १० हजार कोटींचा प्रकल्प उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डाव्होसला येण्यासाठी पाच ते सहा तासांचा उशीर झाला. तरिही त्यांनी आल्यानंतर ज्या गतीने काम केले. ती गती अशीच ठेवली तर वेदांता फॉक्सकॉन, एअरबस पेक्षाही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच परत भारतात येत असताना विमानात उद्योगपती जिंदाल यांची भेट झाली. त्यांनी महाराष्ट्रात दहा हजार कोटींचा इलेक्ट्रिक मोटर व्हेईकलचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारू, असे सांगितल्याचेही उदय सामंत यांनी जाहीर केले.

हे ही वाचा >> पहिली बाजू: गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य

देवेंद्र फडणवीस यांनी आमची काळजी घेतली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या सभेमुळे डाव्होसला येऊ शकले नाहीत. मात्र ते सतत आमच्या संपर्कात होते. दिवसातून दोन – तीन वेळा आमच्याशी फोनवर बोलून ते आमच्याशी संवाद साधत होते. सामंजस्य करार किती झाले, यासोबतच आमच्या तब्येतीचीही काळजी ते घेत होते. आमच्यासोबतच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची काळजी घेणारा उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळाला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

हे ही वाचा >> “आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद, उद्धव साहेबांनी आता…”; डाव्होस दौऱ्यावरून झालेल्या आरोपाला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

एक लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन ते अमलात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. हे करार फक्त स्वाक्षरी पुरते झालेले नाहीत. या करारांमुळे महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होसवरुन परतल्यानंतर दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister uday samant reveals details in what happens in davos wef 2023 kvg