देशातील ७२०० किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. लेह आणि लडाख या पर्वतीय प्रदेशांतील राज्यमार्गाचेही रूपांतरण करण्यात येणार आहे.
यूपीए सरकारच्या काळात १७ हजार किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. गेल्या १० वर्षांत १० हजार किलोमीटर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाले आहे, अशी माहिती या बैठकीनंतर एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.
सध्या देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळणे ८० हजार किलोमीटपर्यंत आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांतर्गत’ नव्या महामार्गाचा विकास करण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्तेबांधणी योजना राबवण्यासाठी ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पा’ची स्थापना केली.