देशातील ७२०० किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. लेह आणि लडाख या पर्वतीय प्रदेशांतील राज्यमार्गाचेही रूपांतरण करण्यात येणार आहे.
यूपीए सरकारच्या काळात १७ हजार किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. गेल्या १० वर्षांत १० हजार किलोमीटर राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाले आहे, अशी माहिती या बैठकीनंतर एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.
सध्या देशभरात राष्ट्रीय महामार्गाचे जाळणे ८० हजार किलोमीटपर्यंत आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांतर्गत’ नव्या महामार्गाचा विकास करण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्तेबांधणी योजना राबवण्यासाठी ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पा’ची स्थापना केली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
७२०० किलोमीटर रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
देशातील ७२०० किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची गुरुवारी बैठक झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-02-2014 at 02:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet nod to convert 7200 km of state roads to highways