Cable bridge collapsed in machchu river, Gujarat: गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. या दुर्घटनेत अनेकजण पाण्यात पडून जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. झुलता पूल नदीत कोसळल्याची घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पूल कोसळल्यानंतर प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने नदीत पडलेल्या नागरिकांची सुटका करत आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
after nalganga dam overflowed water entered in malkapur and near villages houses damaged
नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले
youth body in box Hadapsar, Hadapsar,
पुणे : हडपसर भागात खोक्यात तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू
Chhota Dadiyal tiger, Moharli, Tadoba-Andhari tiger,
Video : माझं जंगल, माझं राज्य… ‘या’ वाघाने थेट रस्त्यालगतच मांडले ठाण; मग दाढी कुरवळत…
Dispute between two groups in Hariharpeth area of June shahar akola
अकोल्यात दोन गटात वाद; दगडफेक, वाहनांची जाळपोळ
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचावकार्यासाठी तातडीने पथके तयार करण्याची मागणी केली आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.