सेट टॉप बॉक्सच्या वर्गणीदारांची माहिती केबल टीव्ही ऑपरेटर्सकडून मल्टी सिस्टीम ऑपरेटर्स अर्थात ‘एमएसओ’ पुरविण्यात येत नसल्यामुळे टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया(ट्राय)ने या मुजोर ऑपरेटर्सविरोधात दिल्ली न्यायालयात धाव घेतली आह़े  ‘एमएसओ’मुळेच केबल टीव्ही सेवेच्या डिजिटलायझेशनच्या जबाबदारीची हमी देण्यात येत़े  मात्र त्यासाठीच केबल ऑपरेटर टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आह़े
दिल्ली महानगर दंडाधिकारी विद्या प्रकाश यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत ट्रायने म्हटले आहे की, डिजिटल अ‍ॅड्रेसेबर केबल टीव्ही सिस्टीम (दास)च्या अंमलबजावणीसंदर्भातील नियम केबल ऑपरेटर्सकडून मोडण्यात येत आहेत़  खरे तर या अंमलबजावणीसाठीच वर्गणीदारांच्या टीव्हीशी सेट टॉप बॉक्स जोडण्यात आले आहेत़  ही तक्रार बाराहून अधिक ऑपरेटर्सबाबत करण्यात आली आह़े
वर्गणीदारांच्या आवडीच्या वाहिन्या आणि इतर सविस्तर माहिती केबल ऑपरेटर्सकडून संचालित करण्यात येत नाही आणि ती नियमानुसार ‘एमएसओ’ला वेळोवेळी पुरविण्यातही येत नाही़  मे २०१२ मध्ये दर्जेदार सेवेची मानांकने निश्चित करण्यात आली़  केबल टीव्ही सेवेची जोडणी, तोडणी, स्थानांतरण, वर्गणीदारांच्या तक्रारी हाताळण्याच्या पद्धती, सेट टॉप बॉक्सचा पुरवठा, देयक भरणा, केबल ऑपरेटर्सच्या जबाबदाऱ्या आदी अनेक गोष्टींचा या नामांकनांच्या निकषांमध्ये समावेश आह़े यातील एका तरतुदीनुसार सेवेचा दर्जा सांभाळणेही केबल ऑपरेटर्सना बंधनकारक आह़े
त्यामुळे केबल ऑपरेटर्सनी सेट टॉप बॉक्सची संख्या आणि इतर संबंधित माहिती पुरविणे बंधनकारक आह़े  मात्र सर्वच केबल ऑपरेटर्स याबाबत माहिती पुरवीत नाहीत़  त्याबद्दल पाठविण्यात आलेल्या नोटिशींचा योग्य सन्मानही करीत नाहीत, असे ट्रायचे म्हणणे आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा