हल्ली महागाईच्या काळात सर्वच गोष्टी महाग झालेल्या असताना घर खरेदी ही अनेक कुटुंबांच्या आवाक्याच्या बाहेरची बाब ठरली आहे. त्याशिवाय एक सुखी आयुष्य मिळवण्यासाठीची आर्थिक तरतूद ही प्रत्येकाचीच प्राधान्याची बाब असते. त्यासाठी प्रत्येकजण कष्ट उपसत असतो. पण जर कुणी तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला राहायला जागा न देता चक्क तुम्हाला पैसे देऊन राहायला बोलवत असेल तर? कुणाचाही विश्वास बसणं तसं कठीणच आहे. पण हे खरं आहे. पण कुठे? मनीकंट्रोलनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

हे सगळं घडतंय इटलीमध्ये! अशा प्रकारे समोरून आपल्याला पैसे देऊन कुणी इटलीमध्ये राहायला बोलवतंय ही तशी अविश्वसनीय बाबच म्हणायला हवी. पण इटलीतली अनेक निसर्गरम्य ठिकाणं, गावं आणि काही शहरंदेखील अशा प्रकारे पैसे देऊन इतर राज्यांमधल्या आणि इतर देशांमधल्या लोकांनाही आपल्याकडे राहायला बोलवत आहेत. त्याला कारणही तसंच आहे!

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

नेमकं काय घडतंय इटलीत?

इटलीतल्या कॅलेब्रिया भागात तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून अशा प्रकारची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, कॅलेब्रियामध्ये येऊन वास्तव्य करणाऱ्यांना प्रशासनाकडून हप्त्याने किंवा एकरकमी २६ हजार युरो, अर्थात जवळपास २६ लाख रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे घर खरेदीसाठी दिले जाणार असून त्याबदल्यात कॅलेब्रियामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पण हे करताना येणाऱ्या लोकांसाठी काही अटीही कॅलेब्रिया प्रशासनानं घालून दिल्या आहेत.

काय आहेत अटी?

कॅलेब्रिया प्रशासनाने घातलेल्या अटींमध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ही ‘ऑफर’ फक्त वय वर्षे ४० च्या आतील नागरिकांसाठीच उपलब्ध असेल. शिवाय, एकदा प्रक्रिया पूर्ण झाली, की त्यानंतर पुढच्या ९० दिवसांत म्हणजेच तीन महिन्यांत संबंधितांना स्थलांतर करावं लागेल. या यादीतली तिसरी महत्त्वाची अट म्हणजे स्थलांतर व्यक्तीची कॅलेब्रियामध्ये आल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी. एकतर हा व्यवसाय शून्यापासून नव्याने सुरू केलेला असावा किंवा कॅलेब्रियामधील स्थानिकांनी दिलेल्या यादीतील इतर व्यवसायांमध्ये रोजगार निवडण्याचा पर्याय असावा!

सागरी किनाऱ्यानं नटलेला कॅलेब्रिया!

कॅलेब्रियाला निसर्गसौंदर्यानं नटलेला असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कॅलेब्रियामधील लोकसंख्ये कमालीच्या वेगाने घटली आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांना आणि स्थानिक प्रशासनाला त्याची चिंता वाटू लागली असून त्याचा परिणाम या भागाच्या आर्थिक स्थितीवरही होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून ही भन्नाट कल्पना कॅलेब्रिया प्रशासनानं शोधून काढली आहे.

कॅलेब्रियाचं गणित एकदम सरळ आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन देणं जे मेहनत घ्यायला तयार आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची ज्यांची तयारी आहे. त्याबदल्यात त्यांना २६ लाखांची आर्थिक मदत प्रशासनाकडून दिली जाईल. स्थलांतर करणाऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी सुलभता व्हावी, यासाठी ही रक्कम हप्त्याने किंवा एकरकमी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Story img Loader