कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी रविवारी न्यायदानाच्या कामातून निवृत्ती घेण्याची घोषणा करत राजकारणात उतरण्याचे संकेत दिले. एबीपी आनंद या बंगाली वृत्तवाहिनीला मुलाखत देताना न्यायाधीश गंगोपाध्याय म्हणाले की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाने मला अनेकदा राजकारणात येऊन भिडण्याचे आव्हान दिले होते, त्यामुळे हे आव्हान स्वीकारण्यास हरकत नाही, असा विचार मी यावेळी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय पक्षाने तिकीट दिल्यास निवडणुकीत उतरणार

न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांची कारकिर्द अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे. ते अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. कधी वाद तर कधी बहिष्कार, आपल्याच सहकाऱ्यांवर आणि वकिलांवर आरोप, त्यानंतर माफी, तसेच वृत्तवाहिनींना मुलाखती देऊन न्यायालयीन प्रकरणावर भाष्य केल्यामुळे ते अनेकदा चर्चेत होते. गंगोपाध्याय वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, त्यांना जर एखाद्या पक्षाने तिकीट दिले तर ते नक्कीच निवडणूक लढवतील. पण त्यांनी पक्षाचे नाव सांगणे टाळले.

लोकसभेसाठी तिकीट कापल्यानंतर माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजकारणालाच राम-राम

राष्ट्रपतींकडे मंगळवारी राजीनामा देणार

न्या. गंगोपाध्याय म्हणाले की, सोमवारी (४ मार्च) त्यांचा न्यायालयातील शेवटचा दिवस आहे. मंगळवारी ते राष्ट्रपतींना राजीनामा पाठवून देतील. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. तृणमूलच्या काळात राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. तसेच न्यायालयात आता सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले.

“एक बंगाली नागरिक या नात्याने मला राज्यातील परिस्थिती पटत नाही. ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली, त्यांच्यापासून राज्याला मात्र काहीही मिळाले नाही. त्यामुळेच मी हे आव्हान पेलण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी मी निवृत्ती घेत आहे. सोमवारी मी न्यायालयात जाणार असून माझ्या हातातली प्रकरणे मला संपवावी लागणार आहेत”, असे न्या. गंगोपाध्याय म्हणाले.

शिवीगाळ, चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली; पहिल्या यादीतूने ‘हे’ नेते बाहेर

तृणमूलचा कयास खरा ठरला

न्या. गंगोपाध्याय यांच्या निर्णयावर तृणमूलकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते देबांग्शू भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही हे फार आधीपासून सांगत होतो की, ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. आज त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमचा कयास खरा ठरला. याबद्दल त्यांचे आभार मानतो.

भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

भाजपाकडून निर्णयाचे स्वागत

दुसऱ्या बाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजूमदार यांनी गंगोपाध्याय यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अभिजीत गंगोपाध्याय यांच्यासारख्या व्यक्तींची राजकारणाला गरज आहे. ते देशहित समोर ठेवून काम करणारे आहेत. मला वाटतं भाजपा ही त्यांची नैसर्गिक पसंती ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया मजूमदार यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calcutta high court justice abhijit gangopadhyay says quitting judiciary to join politics kvg
Show comments