अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील हाफ मून बे येथे झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या दोन दिवसांतली ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. दरम्यान, सोमवारी डेस मोइनेस येथील शाळेत झालेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिर तोडफोड प्रकरण : ‘इस्कॉन’चे उपाध्यक्ष राधारमण दास यांचे गंभीर आरोप; म्हणाले, “जर पोलिसांनी…”

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास कॅलिफोर्नियातील हाफ मून बे येथे गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिसांनी पोलिसांना सात जणांचे मृतदेह तर एक जण गंभीर असल्याचे आढळून आले. त्यांनी जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी ६७ वर्षीय चुनली झाओ या संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती कॅलिफोर्निया पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशच्या ‘मुलायम सिंह यादव’ची अनोखी प्रेमकथा, लुडो खेळताना पाकिस्तानी मुलीशी प्रेम, लग्नानंतर पोलिसांकडून अटक

डेस मोइनेस येथील शाळेत गोळीबार

सोमवारी डेस मोइनेस येथील शाळेतही गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर यावेळी एका शिक्षकालाही गोळी लागली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील एका शेताजवळही गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: California half moon bay shooting seven killed accused arrested spb
Show comments