पीटीआय, न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथून गेल्या महिन्यात चोरीस गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्या वस्तूंच्या दुकानात सापडला आहे. हा परिसर गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखला जातो, असे वृत्त स्थानिक ‘मक्र्युरी न्यूज’ने दिले आहे. हा पुतळा सुमारे २०० किलो वजनाचा असून तो १९९९ मध्ये पुण्यामधून भेट देण्यात आलेला होता. ग्वाडालूप रिव्हर पार्क येथून तो ३१ जानेवारीला चोरीला गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला जाऊन पुन्हा सापडण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी तो पुण्याहून सॅन होजेसला आणल्यानंतर घरातून चोरीला गेला होता, त्यानंतर तो काही महिन्यांनंतर सापडला होता. त्यानंतर २००२ मध्ये हा पुतळा बसवण्यात आला होता.