Crime News :रस्त्यावर एखाद्या व्यक्तीच आपघात झाल्यानंतर अनेकदा इतर लोक त्याच्या मदतीसाठी पुढे येतात. अशावेळी मदत केल्याने अपघातात जखमी असणाऱ्यांचा जीव वाचण्याची शक्यता देखील वाढते. पण दिल्लीच्या गुरूग्राम येथे याच्या उलट प्रकार घडला आहे. गुरूग्राम येथे ११ जानेवारी रोजी एक कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍याचा पहाटे कामावरून घरी जात असताना अपघात झाला. या दुर्घटनेत या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. पण जेव्हा हा अपघात घडला तेव्हा या व्यक्तीची मदत करण्याऐवजी तीन जण त्याची मोटार सायकल घेऊन पळाले. पण हे तीन चोर मोटर सायकल घेऊन फार दूर पोहचू शकले नाहीत. कारण थोड्याच वेळात या तिघांचा देखील अपघात झाला अशी माहिती पोलि‍सांनी दिली आहे.

मृ्त्यू झालेल्या कॉल सेंटर कर्मचार्‍याचे नाव विकास असून मोटार सायकल घसरल्याने त्याचा एमजी रोडवर पहाटे तीन वाजता अपघात झाला होता. या अपघातात विकासला गंभीर दुखापत झाली होती अशी माहिती पोलि‍सांनी दिली.

Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
Three soldiers killed in Bandipora
बांदीपोरामध्ये तीन जवानांचा मृत्यू; लष्कराच्या वाहनाला अपघात; दोन जखमी
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना

“त्याला रक्तस्त्राव होत असताना, तीन जण – उदय कुमार, टिंकू आणि परमबीर हे त्या अपघाताच्या ठिकाणी आले. विकासची विचारपूस करण्याऐवजी फतेहपूर बेरी येथील रहिवासी असलेले हे तिघे विकासची मोटार सायकल घेऊन पळाले, त्यांनी मृत्यूशी झुंजत असलेल्या विकासला तिथंच सोडलं”, अशी माहिती पोलीस अधिकार्‍याने दिली.

पण ही मोटार सायकलची अवस्था चांगली नसल्याने ती थोडं पुढं गेल्यावर पुन्हा रस्त्यावर घसरून पडली आणि काही मिटर अंतरापर्यंत घसरत केली. या अपघातात मोटार सायकल चोरून पळणारे तीन चोरही जखमी झाले.

“आम्हाला दोन पीसीआर कॉल आले, पहिला एमजी रोड तर दुसरा एमबी रोड. एमजी रोड येथे पोहचल्यावर विकास मृत अवस्थेत आढळून आला. तर एमबी रोडवर तीन जण जखमी अवस्थेत आढळून आले. त्याना नंतर एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले”, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. दुर्घटना झाली त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या संपूर्ण घटनेचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितेल.

तिघेही त्या रात्री नशेच्या अंमलाखाली होते आणि ते ड्रग्जच्या आहारी गेलेल आहेत. उदय हा सध्या कोमामध्ये आहे तर टिंकू आणि परमबीर यांची प्रकृती स्थिर आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

Story img Loader