सातत्याने होणाऱ्या कॉल ड्रॉपवर लगाम बसवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना 58 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ही आकडेवारी जानेवारी 2018 ते जून 2018 या कालावधीतील आहे.

दंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बीएसएनएल आणि आयडियासह इतर कंपन्यांचाही समावेश आहे. जून 2018 ला संपलेल्या तिमाहीदरम्यान, बीएसएनएलला चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, एकट्या आयडीया कंपनीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय , मार्च 2018मध्ये संपलेल्या तिमाहीत बीएसएनएल, आयडीया, टाटा आणि टेलीनॉरवरही दंड लावण्यात आला.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणनं (ट्राय) कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याबद्दल दूरसंचार कंपन्यांना हा दंड ठोठावला आहे. दूरसंचार कंपन्या देत असलेल्या सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आलाय.

Story img Loader