यूपीएने त्यांच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईकचा दावा केला आहे. मात्र या दाव्यावर निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात, यूपीएच्या काळात जे काही झालं त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणा किंवा सीमा भागात कायम केली जाते तशी कारवाई म्हणा. मला त्याच्या नक्की तारखा काय होत्या? कोणत्या भागात हे करण्यात आले? हे सांगता येणार नाही. त्यामुळे यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईक झाले मात्र आम्ही त्याचा वापर मतांसाठी केला नाही असा दावा काँग्रेसने गुरूवारी केला.

मात्र या दाव्याबाबत आता निवृत्त सैन्य अधिकारी डी. एस हुड्डा यांनी सहा सर्जिकल स्ट्राईकचा जो दावा काँग्रेसकडून केला जातो आहे ते कुठे आणि कधी करण्यात आले ते सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे. सहा सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा मला सांगता येणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुळात जे सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणायचे की सीमाभागात केली जाणारी कारवाई असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामुळे काँग्रेसचा दावा फोल ठरताना दिसतो आहे.

दरम्यान यूपीएच्या राजवटीत झालेले सर्जिकल स्ट्राईक लष्करालाही कळले नाहीत असं म्हणत राज्यवर्धन राठोड यांनीही टीका केली आहे. सगळं लष्कर सध्या भाजपासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. लष्कराचा पाठिंबा भाजपा आणि मोदींना असाच मिळालेला नाही. आम्हाला सगळी परिस्थिती माहित आहे तशीच लष्करालाही ठाऊक आहे म्हणूनच हा पाठिंबा मिळाला आहे असं राठोड यांनी म्हणत काँग्रेसचा दावा खोडून काढला आहे.