भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ब्रिटनच्या एका प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमादरम्यान एका कॉलरनं त्यांची तुलना ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेसोबत केली आहे. ऋषी सुनक इंग्लंडवर प्रेम करत नाहीत. बऱ्याच लोकांच्या मते ते ब्रिटिशही नाहीत, अशी टीका या कॉलरनं केली आहे.

Rishi Sunak New British PM: सुनक PM झाल्यानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया; दिवाळी अन् २०३० चा उल्लेख करत म्हणाले, “ब्रिटनमधील भारतीयांसाठी…”

“आम्ही मतदार आहोत आणि आमचं समर्थन बोरिस यांना आहे. पुढच्या निवडणुकीत जिंकण्याची बोरिस यांना सर्वाधिक संधी आहे. ऋषी हे या निवडणुकीत जिंकू शकणार नाहीत. ज्याप्रमाणे बोरिस इंग्लंडवर प्रेम करतात त्याप्रमाणे ऋषी इंग्लंडवर प्रेम करत नाहीत”, असा आरोप जेरी नावाच्या एका व्यक्तीनं ‘एलबीसी’ या रेडिओ कार्यक्रमात केला आहे. ऋषी सुनक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या व्यक्तीला कार्यक्रमाच्या निवेदिकेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. “सुनक यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून त्यांनी या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर दुसरीकडे बोरिस जोन्सन यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला आहे” असं निवेदिकेनं जेरी यांना सांगितलं.

सुनक आमचेच! पाकिस्तानी समाजमाध्यमांवर दावा

ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्थी यांचा अमेरिकेसह भारतात व्यवसाय आहे. त्यामुळे ते ब्रिटिश नाहीत, हे दिसून येत असल्याचं जेरी यांनी म्हटलं होतं. हुजूर पक्षाच्या सदस्यत्वाचा दावा करणाऱ्या जेरी यांनी अल-कायदामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ब्रिटिश नागरिक असल्याची मुक्ताफळंदेखील उधळली आहेत. “मी पाकिस्तान किंवा सौदी अरेबियाचा पंतप्रधान झालो याचा उल्लेख तुम्ही करू शकाल का? नाही. इंग्लंडमधील ८५ टक्के नागरिक गौर वर्णाचे आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व करणारा पंतप्रधान त्यांना हवा आहे. मी फक्त भारतात जाऊन त्या देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही”, असे सांगताना सुनक यांनी देशप्रेम सिद्ध केलं नसल्याचं जेरी यांनी रेडिओ कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.

ऋषी सुनक यांना शुभेच्छा देताना आनंद महिंद्रांनी १९४७ ची खदखद बोलून दाखवली, म्हणाले…

जेरी यांनी वर्णद्वेषी वक्तव्य केल्यानंतर कार्यक्रमाच्या निवेदिकेनं हस्तक्षेप करत त्यांना चांगलंच सुनावलं आहे. “मला वाटतं की तुम्ही कट्टर वर्णद्वेषी आहात. तुम्ही आणि टोरी यांच्या पक्षातील सदस्यांनी असा विचार करणं फारच आश्चर्यकारक आहे”, असं म्हणत निवेदिकेनं जेरी यांना गप्प केलं. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Story img Loader