नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत.

पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. चंडिगड या एका केंद्रशासित प्रदेशातही मतदान होणार आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमधील भंटिडा मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे महत्त्वाचे उमेदवार आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> मतमोजणीसाठी व्यूहरचना; गैरप्रकार रोखण्यासाठी ‘इंडिया’ सतर्क; नागरी संघटनांचाही सक्रिय सहभाग

काशीची निवडणूक विकसित भारताच्या निर्मितीचे प्रतीक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीच्या मतदारांना १ जून रोजी मतदान करताना नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. काशीची निवडणूक केवळ नवकाशी नव्हे, तर विकसित भारताच्या निर्मितीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मतदानापूर्वी मोदींनी वाराणसीतील मतदारांसाठी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. ‘‘माझ्यासाठी काशी ही भक्ती, शक्ती आणि अलिप्ततेची नगरी आहे. काशी ही जगाची सांस्कृतिक राजधानी, संगीताची भूमी आहे. या शहराचे प्रतिनिधी बनणे हे बाबा विश्वनाथांच्या अपार कृपेने आणि तुमच्या आशीर्वादानेच शक्य आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले. काशीच्या जनतेचे प्रत्येक मत माझ्या ताकदीत भर घालेल आणि मला नवी ऊर्जा देईल, असे त्यांनी सांगितले.

कुठे मतदान?

उत्तर प्रदेश : १३

पंजाब : १३

पश्चिम बंगाल : ९

बिहार : ८

ओडिशा : ६

हिमाचल प्रदेश : ४

झारखंड : ३

चंडिगड : १

Story img Loader