जम्मू : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील जसरोटा पट्ट्यात रविवारी प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती बिघडली. वैद्याकीय उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर खरगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. ‘‘माझे वय ८३ आहे. मला इतक्या लवकर मृत्यू येणार नाही. पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवेपर्यंत मी जिवंत राहीन…’’ असे खरगे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच

Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Arguments over performance of MLA Prashant Thakur during this period
ठाकूरांच्या कामगिरीवरून वाद;पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाचे मुद्दे ऐरणीवर
maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
maharashtra vidhan sabha election 2024 pune assembly constituency bjp brahmin jodo
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील प्रचार रविवारी संध्याकाळी समाप्त झाला. या टप्प्यासाठी मंगळवार, १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात पाकिस्तान, अनुच्छेद ३७०, दहशतवाद आणि आरक्षणासह विविध मुद्द्यांवर राजकीय पक्षांनी प्रचार केला.

जम्मू, उधमपूर, सांबा आणि जम्मू विभागातील कठुआ आणि उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या सात जिल्ह्यांमधील ४० विधानसभा मतदारसंघांत या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेस नेते ताराचंद आणि पीडीपीचे मुझफ्फर बेग यांच्यासह ४१५ उमदेवार रिंगणात आहेत. याआधीच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी चांगली होती. १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात ६१.३८ टक्के आणि २६ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात ५७.३१ टक्के मतदान झाले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यघटनेचे अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत.