निवडणुकीच्या रिंगणात नरेंद्र मोदी यांच्यासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाचा पराभव झाला हे मान्य करण्याची क्षमता त्या पक्षात आहे का, असा सवाल करून भाजपने बुधवारी पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदासाठी उमेदवार होते, मात्र त्यांची मोदी यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही, हे सत्य स्वीकारण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर केला आहे.
काँग्रेस पक्षावर एकाच कुटुंबाचे नियंत्रण आहे आणि पक्ष झालेल्या चुका सुधारणार आहे का, असाही सवाल जेटली यांनी यावेळी केला.
झालेल्या चुका सुधारण्याच्या मन:स्थितीत सध्या काँग्रेस नाही आणि त्यामुळे ते झालेल्या चुकांचे समर्थन करणार आणि ते त्यांना २०१४ मध्ये भोवणार आहे, असे जेटली यांनी मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांचा संदर्भ देऊन सांगितले.

Story img Loader