रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले सुरूच असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी परत आणा, अशी मागणी होत आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना देशात परत आणलं गेलं असून अनेकांना युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये नेण्यात आलंय. तिथून त्यांना भारतात आणलं जाईल. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी एक सवाल उपस्थित केला आहे.
रशियन सैनिकांनी केलं भारतीय विद्यार्थिनींचं अपहरण; एका विद्यार्थिनीनं सांगितला भयानक अनुभव
भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना, एका सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ दिला. ज्यामध्ये युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी त्यांनी काय केलं, असा सवाल लोकांनी त्यांना विचारला होता. यावर सरन्यायाधिशांनी, मी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवण्यास सांगायला हवं का?, असा प्रश्न विचारला आहे.
Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
“सोशल मीडियावर, मी भारताचे सरन्यायाधीश काय करत आहेत, अशी विचारणा करणारे काही व्हिडीओ पाहिले. मी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का,” असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. युक्रेनच्या सीमेवर अडकलेल्या २०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली. “आम्हाला विद्यार्थ्यांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. भारत सरकार त्यासाठी काम करत आहे. तरीही आम्ही अॅटर्नी जनरलला विचारू की काय करता येईल,” असं ते म्हणाले.
Russia-Ukrane War: “तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल, आम्ही युक्रेनला अण्वस्त्रे…”; रशियाचा गंभीर इशारा
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया ‘मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग’ तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे हा निर्वाळा देण्यात आला आहे.
Ukraine War: “हे पुतिन यांना दाखवा…”; सहा वर्षीय मुलीच्या मृत्यूवर युक्रेनियन डॉक्टरांचा आक्रोश
भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचे भारतातील नवे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी स्पष्ट केले, की, रशिया भारतीयांच्या युक्रेनमधून सुरक्षित स्थलांतरासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग तयार करत आहे. युक्रेनच्या खारकीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यात २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी रशिया करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.