जवळपास गेल्या आठवड्याभरापासून कॅनडा व भारतामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्याप्रकरणात कॅनडानं भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या किंवा तात्पुरत्या स्वरुपात प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना या देशांनी दिल्या आहेत. मात्र, यामुळे कॅनडा किंवा भारतात प्रवास करणाऱ्या या नागरिकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आता कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांचं या संपूर्ण प्रकरणावर वक्तव्य आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

१८ जून रोजी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आठवड्याभरापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप थेट कॅनडाच्या संसदेतच केला. भारताच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचीही त्यांनी हकालपट्टी केली. भारतानं ताबडतोब हे आरोप फेटाळतानाच कॅनडाच्याही उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. दोन्ही देशांनी दुसऱ्या देशात गेलेल्या किंवा जाणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. तर भारतानं कॅनडामधील आपली व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!

एकीकडे कॅनडा व भारतादरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका व ऑस्ट्रेलियाकडून कॅनडाची बाजू घेतली जाताना पाहायला मिळत आहे. “भारतानं तपासात सहकार्य करावं” असं सांगतानाच “आम्ही दोन्ही देशांशी या मुद्द्यावर चर्चा करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत”, असंही या देशांकडून सांगण्यात आलं. आता कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेअर यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले बिल ब्लेअर?

कॅनडानं एकीकडे भारतावर आरोप केले असले, तरी भारताशी आधीच झालेल्या करारांचीही कॅनडाला चिंता असल्याचं ब्लेअर यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. “भारताशी असलेले संबंध कॅनडासाठी महत्त्वाचे आहेत. हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणाचा तपास चालू असतानाच कॅनडा दोन्ही देशांमध्ये असलेला इंडो-पॅसिफिक धोरणात्मक करार अजूनही कॅनडासाठी महत्त्वाचा आहे”, असं ब्लेअर म्हणाले आहेत. पाच वर्षांसाठी तब्बल २.३ बिलियन डॉलर्सचा करार दोन्ही देशांदरम्यान झाला आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांना खलिस्तान समर्थक भूमिका घ्यायला लावणारा जगमित सिंग कोण आहे?

“करार महत्त्वाचाच, पण…”

दरम्यान, एकीकडे करार महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच ब्लेअर यांनीही पंतप्रधान ट्रुडो यांचाच राग आळवला आहे. “आमच्यासाठी करार महत्त्वाचा आहेच. पण त्याचवेळी आमची कायद्याचं रक्षण करण्याचीही जबाबदारी आहे. आमच्या नागरिकांच्या रक्षणाचीही जबाबदारी आमच्यावर आहे. निज्जर हत्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचं आमचं कर्तव्य आहे”, असं ब्लेअर म्हणाले.

“जर हे आरोप खरे ठरले, तर कॅनडा या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेईल. एका कॅनेडियन नागरिकाची कॅनडाच्या भूमीवर हत्या होणं हे कॅनडाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन ठरेल”, असंही ब्लेअर यांनी नमूद केलं.