पाकिस्तानमधील कुमारवयीन मानवाधिकार कार्यकर्ती मलाला य़ुसूफझई हिला कॅनडा सन्माननीय नागरिकत्त्व बहाल करणार आहे. पाकिस्तानमधील सरकारी नभोवाणी वाहिनीने हे वृत्त दिले. 
कॅनडाचे सन्माननीय नागरिकत्व मिळवणारी मलाला ही जगातील सहावी व्यक्ती ठरली आहे. याआधी नेल्सन मंडेला, ऑंग सान सू की, दलाई लामा, अगा खान आणि राओल वॉलेनबर्ग यांना कॅनडाने सन्माननीय नागरिकत्व बहाल केले होते. मुलींनी शाळेत जाऊ नये, असा तालिबान्यांनी काढलेला फतवा जिवाची पर्वा करता मलाला युसुफझई हिने झुगारला होता. गेल्यावर्षी मलालावर तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यातून बचावल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष मलालाकडे वेधले गेले. यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी मलाला नामांकन मिळाले होते. एवढ्या लहान वयात शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळणारी ती पहिली व्यक्ती आहे.